Cyber Crime : सध्याचं युग सोशल मीडियाचं (Social Media) आहे, असं आपण सर्रास ऐकतो. पण, याच सोशल मीडियाच्या जाळ्यात अनेकजण गुरफटले जातात. केरळमधील 82 वर्षांची महिला सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं एका वृद्ध महिलेला लक्ष्य करुन तिच्या बँक खात्यातून 72 लाख रुपये चोरले.
Cyber Crime: सध्याचं युग सोशल मीडियाचं (Social Media) आहे, असं आपण सर्रास ऐकतो. पण, याच सोशल मीडियाच्या जाळ्यात अनेकजण गुरफटले जातात. तर, अनेकांना या जाळ्यात अडकवलं जातं. सायबर ठगांनी (Cyber Fraud) आजवर अनेकांना वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लुटल्याचे प्रकार समोर आलेत. असचं एक प्रकरण केरळमधून (Kerala News) समोर आलं आहे. केरळमधील 82 वर्षांची वयोवृद्ध महिला सायबर ठगीची (Cyber Crime) शिकार झाली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं महिलेला लुटल्याचं समोर आलं आहे.
केरळमधील 82 वर्षांची महिला सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं एका वृद्ध महिलेला लक्ष्य करुन तिच्या बँक खात्यातून 72 लाख रुपये चोरले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेनं सांगितलं की, 23 ऑगस्टला तिला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्यानं स्वतःची ओळख आरबीआय ऑफिसर म्हणून सांगितली. यानंतर आरोपीनं महिलेला तिचे क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगितलं आणि त्याकडे तातडीनं लक्ष देऊन अनब्लॉक करण्याचा सल्ला दिला.
यानंतर महिलेला दुसरा फोन आला आणि त्यानंतर ठगानं सीबीआय अधिकारी म्हणून महिलेला आपली ओळख सांगितली. बनावट सीबीआय अधिकाऱ्यानं महिलेला सांगितलं की, तिच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक आरोपही करण्यात आल्याचं त्यानं महिलेला सांगितलं. महिला खूपच घाबरली. त्यानंतर त्या भामट्यानं तपास सुरू असेपर्यंत सहकार्य करा, असंही महिलेला बजावलं. त्यापुढे बनावट कागदपत्र दाखवून महिलेला डिजिटल पद्धतीनं अटक करण्यात आली आणि त्यानंतर थेट अटकेची धमकी देण्यात आली.
महिलेकडून बँक अकाउंटची माहिती घेतली
भामट्यानं महिलेकडून हळूहळू माहिती घेण्यास सुरुवात केली. महिलेला हा तपासाचाच एक भाग असल्याची बतावणी देखील त्यानं केली. पुढे त्याला सांगण्यात आलं की, जर त्यानं महिलेला तपासात सहकार्य केलं नाही, तर तिला तात्काळ अटक करण्यावाचून पर्याय नसेल, असंदेखील सांगितलं. त्यानंतर घाबरलेल्या महिलेनं आपले सर्व अकाउंट डिटेल्स भामट्याला दिले. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या अकाउंटमधून 72 लाख रुपये उडाले.
सायबर ठगांपासून सावध राहा
सायबर फसवणूक टाळण्यासाठी, कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका. याशिवाय तुमच्या फोनवर आलेला ओटीपी अजिबात शेअर करू नका. तसेच, फेक मेसेजवर क्लिक करू नका किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका.