75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Rape

Ujjain Rape Case : उज्जैनमध्ये घडलेल्या घटनेनंतर सर्व स्तरातून मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका होत आहे. 

Ujjain Rape Case : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भरदिवसा, भर रस्त्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंबंधी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर मध्य प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. 

मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील कोयला फाटक या भागातील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. बलात्काराची ही घटना घडत असताना आजूबाजूचे कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी गेले नाहीत. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. उज्जैनमध्ये ही घटना घडत असताना लोक फक्त व्हिडीओ काढत होती. त्या महिलेच्या मदतीला कोणीही गेले नसल्याने लोकांमधील संवेदनांना काय झालंय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  

उज्जैनच्या कोयला फाटक भागात एका महिलेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ हा व्हिडिओ दुपारचा आहे. भर रस्त्यावर मोकळ्या ठिकाणी एका तरुणाकडून या महिलेवर बलात्कार होत आहे. महिलेला मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय.

लोक व्हिडिओ बनवत राहिले

फुटपाथवर एक तरुण उघडपणे एका महिलेवर बलात्कार करत होता. यावेळी काही लोक तेथून गेले. त्यांनी व्हिडीओही बनवला पण महिलेला मदत केली नाही. ही महिला मजूर असून ती कोल गेट परिसरातून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाने तिला अडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

काँग्रेसचा मोहन यादव सरकारवर हल्लाबोल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार आरोप करण्यास सुरुवात केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

Ujjain Rape Case : उज्जैनमध्ये भररस्त्यावर दिवसाढवळ्या बलात्कार, मदतीला न जाता लोक व्हिडीओ बनवत राहिले

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक

दुसरीकडे उज्जैन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिलेकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Rape
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...