इंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.
डोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. पण याच देशात अकराशे वर्षांपासून गणपती बाप्पांचे अस्तित्व आहे. जावा बेटावरच्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिरात गणपती आहे.
गेबांगमध्येही आठव्या शतकातलं एक मंदिर आहे. मेदंग राज्यकर्त्यांच्या काळात हे मंदिर उभारण्यात आलंय. चर्तुभूज गणेशाच्या हातात लाडूंचं ताट आहे. या लाडवांच्या ताटामागेच उंदिर दिसतोय.
दोन्ही पाय जुळलेल्या अवस्थेत आहेत. गणेश चतुर्भूज असून त्याच्या हातात परशू आहे. या मंदिराच्या एका भिंतीवर गणपती बाप्पांचे शिल्प कोरलेलं आहे. गणेशाची मूर्ती चतुर्भूज आहे.
डाव्या सोंडेचा हा गणपती आहे. कमळाच्या शिल्पावर विराजमान हा गणपतीच्या सोंडेत मोदक आहे.
मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि शिवाची देवालयं आहेत. यातल्या शिव मंदिरात गणपती विराजमान आहेत.
इंडोनेशियातल्या प्रम्बानन मंदिर हे सर्वात जुनं मंदिर आहे. नवव्या शतकात बांधलेल्या या मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंथी बांधकामाशी नातं सांगणारी आहे.