75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

लोकसभा

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यांत मतदान पार पडलं. उर्वरीत दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नाहीये. दरम्यान आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार त्याची. गावागावात, पारापारावर मतदार राजा कोणाच्या बाजूनं कौल देईल? याची चर्चा रंगली आहे. अशीच चर्चा सुरू असताना एका तरुणाला आपला जीव गमावावा लागाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

लग्न करून देत नाही म्हणून मुलांनीच बापाला संपवलं, छ. संभाजीनगर हादरलं..

मिळत असलेल्या माहितीनुसार, नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात पारावर बसलेल्या दोन तरुणांमध्ये वाद झाला, वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीमध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमीक अंदाज आहे. मात्र दुसरीकडे या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर चर्चा सुरू होती, आणि त्यातूनच वाद झाल्यानं हा प्रकार घडला असल्याची देखील चर्चा आहे.

सतीश फुले असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर  प्रवीण बोरडे असं आरोपीचं नाव आहे. या मारहाण प्रकरणात पोलिसांनी सावरगावमधून प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Arun Gawli : चुकीला माफी मिळणार का नाही? अरुण गवळी सुटका प्रकरणात नवा ट्विस्ट..

लोकसभा
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...