नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील एका वीट (Bricks Factory) कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर नऊ कामगार जखमी झाले आहेत.
जिल्ह्यातील एका वीटा कारखान्यात (Bricks Factory) आज पहाटे स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मौदा तालुक्यातील युनिट येथे ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्री जी ब्लॉक या नावाच्या खासगी कंपनीत सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचं काम केलं जातं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील झुल्लर गावी वीट बनवण्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळं कारखान्यासाठीचे टिन शेड खाली कोसळले. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. नऊ कामगार जखमी आहेत. नंदकिशोर करंडे असं या मृतकाचे नाव आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपुरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
कंपनीत मोठा स्फोट : या आधीही अशीच एक घटना घडली होती. नागपूर-अमरावती मार्गावर असलेल्या धामणा इथल्या स्फोटकांच्या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू तर 5 कामगार जखमी झाले होते
Kalyan Accident : भीषण! भीमाशंकरला निघाले, कल्याण-मुरबाड रस्त्यावर अर्टिगाची झाडाला जोरदार धडक, तिघांचा मृत्यू