75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Arun Gawli

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुदतपूर्व सोडण्याबाबत नवा ट्विस्ट आला आहे, त्यामुळे डॅडी आता नागपूर कारागृहातून बाहेर येणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Arun Gawliअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला(Arun Gawli) मुदतपूर्व सोडण्याबाबत नवा ट्विस्ट आला आहे. अरुण गवळीला मुदतपूर्व शिक्षेपासून सोडायला राज्य सरकारने विरोध केला आहे. अरुण गवळीला शिक्षेतून सूट देण्याच्या विरोधात गृह विभागाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अरुण गवळी उर्फ डॅडीने वयाची 65 वर्ष पूर्ण केली आहेत. 2015 नियमाचा आधार घेत शारिरिक दृष्ट्या अशक्त असल्याने उर्वरित शिक्षा कमी करावी, अशी मागणी करणाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीच्या ब्लास्टमध्ये 8 जणांचा मृत्यू..

नागपूर खंडपीठाने 5 एप्रिल 2024 रोजी अरुण गवळीची(Arun Gawli) विनंती मान्य करत गृहविभागाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेत उच्च न्यायालयात चार महिने मुदतवाढ मागितली होती.

नागपूर खंडपीठाने सरकारला 1 महिना मुदतवाढ दिली असून यानंतर वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाच्या मुदतवाढीने अरुण गवळीचा तुरुंगातला मुक्काम महिनाभराने वाढणार आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात आहे.

याप्रकरणी गृहविभागाने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली असून त्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Arun Gawli
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...