नागपूर हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे, या प्रकरणातील आरोपीची सुटका करण्यात आली आहे.
रामझुला हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे, या प्रकरणातील आरोपी रितिका मालूची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवली आहे. 24 फेब्रुवारीच्या रात्री दारूच्या नशेत मर्सडीज कार चालवताना दोन बाईकस्वारांना रितिका मालूने चिरडले होते. या घटनेत हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक या तरुणांचा मृत्यू झाला.
दरम्यान घटनेनंतर सुमारे चार महिने ही महिला फरार होती. त्यानंतर तीने एक जुलै रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र तीची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवली आहे. या प्रकरणात कलमवाढ करण्या अगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती, या कारणामुळे रितिका मालूची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली आहे.
नेमंक काय घडलं होतं?
नागपूरमध्ये 4 फेब्रुवारीच्या रात्री दारूच्या नशेत मर्सडीज कार चालवताना या महिलेनं दोन तरुणांना चिरडले होते. या घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक अशी या प्रकरणातील मृत तरुणांची नावं आहेत. नागपुरातील राम झुला येथे ही घटना घङडली होती. दरम्यान घटनेनंतर ही महिला चार महिने फरार होती. त्यानंतर तीने एक जुलै रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र तीची सुटका करण्यात आली आहे. न्यायालनानं तिची अटकच बेकायदेशीर ठरवली आहे.