75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलांनीच आपल्या वडिलांची हत्या केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  लग्न करुन देत नाही, शेतीही वाटून देत नाही. त्यामुळे पोटच्या दोन मुलांनी बापाच्या पोटात सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संपत लक्ष्मण वाहुळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ हे दोन मुले आहे, वाहुळ यांच्या नावावर शेती आहे तर दोन मुले खासगी कंपनीत काम करतात. ८ मे रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास संपत वाहुळ हे एकटे घरी होते. लहान मुलगा प्रकाश हा कंपनीतून घरी येताच वडिलाला शिवीगाळ करू लागला, वडिलांनी विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठा मुलगा पोपटतही त्यावेळी घरी आला असता त्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली.

Arun Gawli : चुकीला माफी मिळणार का नाही? अरुण गवळी सुटका प्रकरणात नवा ट्विस्ट..

दोघेही मारहाण का करता? असे विचारले असता आमचे लग्न करुन देत नाही,  शेतीही वाटून देत नाही असे म्हणत मोठ्या मुलाने वडिलांवर सपासप चाकूचे वार केले, दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला,आरडा ओरड झाल्याने संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहूळ, संजय वाहुळ, आकाश आणि संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले. त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी देखील या मुलांनी दिली होती.

दरम्यान त्यानंतर संपत वाहूळ यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान उपचार सुरू असतांना काल रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान संपत वाहूळ यांचा मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीच्या ब्लास्टमध्ये 8 जणांचा मृत्यू..

 

संभाजीनगर
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...