लोकसभा निवडणुकीच्या आधी बीआरएसला मोठा धक्का बसला असून जळगाव बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लक्ष्ण पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. या प्रवेशावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना टोमणा मारला.
आता थेट हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे. माझं मत मी मांडलेलं आहे, ही एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकूमशाला पुन्हा एकदा देशाने स्वीकारणे घातक आहे. आपल्याला वाटत संमिश्र सरकार नको, पण इतिहास जर बघितला तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा संमिश्र सरकार चांगल्या प्रकारे चालवलं होतं. नरसिंहराव मनमोहन सिंग त्यांनी सुद्धा चांगलं सरकार चालवलं. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे सरकार संमिश्र हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
फक्त QR कोडवरुन पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाच्या पालकांचा शोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं तर वंचित बहुजन आघाडीला टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,“मनसेच्या भूमिकेचं कौतुक करतो. काही जण बिन शर्त पाठिंबा देतात, तर काहीजण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. हे नाटक आता जनता ओळखत आहे.” वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. पण शेवटी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत अनेक ठिकाणी उमेदवार उभा केले आहेत
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, संपूर्ण देश एका पक्षाकडे दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलं आहे. कणखर नेता आपल्याला हवा पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हवा. जो देईल साथ त्यांचा करू घात असा पक्ष आम्हाला नकोय. आपण मागील दहा वर्षात एक पक्ष एक व्यक्ती आणि आता संपूर्ण देशात ते एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागले आहेत. ही वृत्ती घातक आहे त्यामुळे एका व्यक्तीच्या हातात देश देणे हे घातक आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लवकरच महाविकास आघाडीच्या सभा सुरू होतील. महायुतीच्या सभा जरी सुरू झाले असल्या तरी त्यांचा फॉर्मुला अजून जाहीर झालेला नाही. उमेदवाराचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेत आहेत. याला काही अर्थ नाही आहे. आमच्या एकत्रित सभा सुद्धा सुरू होतील.जागावाटप आमचा झालेला आहे. आता प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची गरज आहे.