75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

लोकसभेच्या तोंडावर पालघर जिल्ह्यात शिवसेना उबाठा आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे व भाजपाचे उपाध्यक्ष यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. पालघरमध्ये मोदींची लाट नाही. बहुजन विकास आघाडीची लाट असल्याचा दावा भाजपातून आलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पालघरच्या बालेकिल्ल्यात ठाकरे व भाजपला धक्का
पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे डहाणू तालुकाप्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे.

मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकामध्ये नाराजी होती. डहाणूचे भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी, पालघर जिल्हा अभिजीत देसक, भाजपचे आदिवासी आघाडी सरचिटणीस गंजाडचे सरपंच, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अशोक भोईर यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. विकास कामे करण्यासाठी आम्ही प्रवेश केला असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे तर भाजपचे उपाध्यक्ष सुरेश पाडवी यांनी सध्या मोदीची लाट नसून पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची लाट असल्याने मी प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितले.

इच्छुक उमेदवारांची गर्दी झाल्याने कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी वेळ जात आहे. येत्या पाच-सहा दिवसात उमेदवार जाहीर करू अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा, तारीखही सांगितली..

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...