75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी अशी मागणी करत पांगुळ गव्हाण ग्रामस्थांनी अन्नत्यागाला सुरूवात केली आहे. 

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण (Pangulgavan Village) या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा, ग्रामस्थांचा एकमुखाने ठराव

पंकजा मुंडे यांचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पचनी पडताना पाहायला मिळत नाही. अनेकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय करियर संपुष्टात आले. म्हणूनच पांडुळ गव्हाण येथे गावातील सगळ्या नागरिकांनी एकत्रित येत गावातील मंदिरावत बैठक बोलावली. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा ठरवा ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मते मिळाली?

परळी विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 66940
पंकजा मुंडे  – 141774

गेवराई विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 134505
पंकजा मुंडे  – 95409

माजलगाव विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 104713
पंकजा मुंडे – 105648

बीड विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 139264
पंकजा मुंडे – 77583

आष्टी विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 139264
पंकजा मुंडे – 77583

केज विधानसभा मतदारसंघ

बजरंग सोनवणे – 123158
पंकजा मुंडे – 109360

Pankaja Munde
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...