75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Pankaja Munde

Pankaja Munde : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव पोपट वायबसे यांच्या जिव्हारी लागला.

Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे याचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने आणखी एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल उघडकिस आली. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायबसे असं मयत तरुणाचे नाव आहे. या आगोदरही अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाने पंकजा यांचा पराभव झाल्याने आत्महत्या केली होती. आता ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव पोपट वायबसे यांच्या जिव्हारी लागला. पोपट पराभव झाल्यापासून तो चिंतेत होता. मंगळवारी रात्री त्याने कोणाला काहीही न बोलता चिंचेवाडी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास लावून जीवन संपविले. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

Maratha Reservation : मराठा-ओबीसी संघर्ष पेटणार? मध्यरात्री मोठ्या घडामोडी…

गळफास घेण्यापूर्वी अगदी काही मिनिटे अगोदर पोपट याने स्वत:च्या मोबाइलवरून अलविदा ही फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर लगेच त्याने जीवन संपवले. बीड जिल्ह्यात अशी दुसरी घटना घडलीय. याआधी पांडुरंग सोनवणे यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंकजा मुंडेंच्या पराभवाने निराश झालेल्या पांडुरंगने शेतात गळफास घेतला. निकालानंतर पांडुरंग निराश झाला होता. त्याने गळफास घेणार असंही गावकऱ्यांना बोलून दाखवलं. त्याची समजूतही गावकऱ्यांनी काढली होती. पण त्यानंतर आठवड्याभरात त्यानं जीवन संपवलं.

Pankaja Munde
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...