75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

BJP Leader Beating Woman : पोलिस ठाण्यामध्येच या भाजप नेत्याने महिलेला मारहाण केली. शिवा तायडे असं या भाजप नेत्याचे नाव आहे. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शिवा तायडे या महिलेला मारतच राहिले.

BJP Leader Beating Woman : बुलडाण्यामध्ये (Buldhana) भाजप नेत्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस ठाण्यामध्येच या भाजप नेत्याने महिलेला मारहाण केली. शिवा तायडे असं या भाजप नेत्याचे नाव आहे. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शिवा तायडे या महिलेला मारतच राहिले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर हा मारहाणीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुषमा अंधारेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर भाजप नेत्याने महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी असे लिहिले की, ‘भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जी बुलडाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलिस स्टेशनमध्येच महिलेला मारहाण. थोर ते गृहमंत्री.. थोर ते पोलिस कर्मचारी.’ या पोस्टद्वारे सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भाजप नेते शिवा तायडे पोलिस ठाण्यात बाकड्यावर बसलेल्या महिलेच्या दिशेने येतात आणि तिला मारहाण करू लागतात. या महिलेसोबत असणाऱ्या आणखी एका महिलेला देखील ते मारहाण करताना दिसतात. या महिलेच्या डोक्यावर मारताना आणि तिला खेचताना ते व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी मध्यस्ती करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शिवा तायडे या महिलेला मारतच राहिले. शिवा तायडे यांनी ही मारहाण का केली यामागचे कारण कळू शकले नाही.

मारहाण
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...