75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

लोकसभा निवडणूक जशी रंगात येत आहे, तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आमचा भाऊ हा तोडी बाज आहेत. पूर्ण महाराष्ट्रात सेटलमेंट करण्यात माहीर आहे. राज्यात एखादा सेटलमेंट कमिशनरचं पद असेल तर त्याला द्यावं, बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जाहीर सभेतून केली. आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या नामांकन आणि जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी रवी राणा यांनी हे गंभीर आरोप केले.

डान्सबार ‘सुंदरी’साठी ‘सैराट’ झाला 24 वर्षीय तरुण; मुंबई, पुणे, कोकणात ‘फोडली’ 29 घरं

आमदार बच्चू कडू यांचा पलटवार
प्रहार संघटनेचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी तोडीबाज असल्याचे पुरावे त्यांनी द्यावे अन्यथा 26 तारखेनंतर आम्ही त्यांना कोर्टात खेचू, काल परवा त्यांनी माफी मागितली. सरड्यापेक्षाही जलद गतीने ते रंग बदलतात, 3 दिवसाआधी माफी मागत फिरत होता. आता ओरडतो, एवढ्या लबाड माणसाला लोक चाहतात कसे. बच्चू कडू हे काँग्रेसचे बी टीम असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर बच्चू कडू यांनी बायको भाजपमध्ये नवरा स्वाभिमानमध्ये पोराला प्रहारमध्ये पाठवून द्यावा. मीच एबीसी करतो, त्या अभिनेत्री आहेत म्हणून त्या रडल्या. त्या कुठल्याही प्रसंगात रडू शकतात, अशी टीका सुद्धा बच्चू कडू यांनी केलेली आहे.

‘आमचा भाऊ काँग्रेसची बी टीम आहे तो विदर्भ सोडून..’; रवी राणांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं..

महायुतीची डोकेदुखी वाढली
भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या प्रहार जनशक्‍ती पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना उमेदवारी घोषित केली आहे. आमदार बच्चू कडू म्हणाले, की मतदारसंघात जेवढे पक्ष असतील ते आम्हाला मत देतील. भाजप, काँग्रेस या पक्षातील सामान्य कार्यकर्ते हे दिनेश बुब यांना मतदान करतील. सामान्य जनतेचा आवाज हे दिनेश बुब आहेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून देखील आमदार बच्चू कडू यांनी टीका केली. एकीकडे बर्वे यांचं जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते तर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय तीन वर्षे होऊनही लागत असल्याने ही तानाशाही आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. न्यायालय न्याय उशिरा देत आहे. भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी न रूचणारी आहे, केवळ मी म्हणत नाही तर आरएसएसचे कार्यकर्ते म्हणतात. पक्षाच्या न्यायालयात नवनीत राणा जिंकल्या असल्या तरी जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकू असे आमदार बचू कडू यांनी सांगितले.

 

बच्चू कडू
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...