75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

डान्सबारमधल्या ‘सुंदरी’च्या प्रेमात पडलेल्या २४ वर्षीय तरुणाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती समोर आलीय. बारगर्लच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्यावर जवळ असलेले पैसे, दागिने उडवले. पण तरीही डान्सबारचा नाद सुटला नाही. शेवटी बारगर्लसाठी त्याने घरफोड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने मुंबई, पुणे आणि कोकणही गाठले. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ तासात तीन घरे त्याने फोडली. शेवटी मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलीसांनाही धक्का बसला.

बारगर्लसाठी घरफोड्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित उर्फ अरहान शेट्टी असं आहे. ७ फेब्रुवारीला त्याने फक्त अर्ध्या तासात तीन घरफोड्या केल्या. एका घरात १२ तोळ्यांचे दागिने, अडीच किलो चांदी आणि २ लाखांची रोकड लांबवली. त्याने घरातून जाताना लोखंडी सळी सोफ्यावरच ठेवली होती. तर दुसऱ्या दोन ठिकाणी साडेचार तोळे सोने आणि ६ तोळे सोने चोरी झाले होते.

Viral video : नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल

पोलिसांनी घरफोडीच्या घटनेनंतर वेगाने तपास सुरू केला. घरफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यातून ह्या सर्व चोऱ्या रोहित शेट्टीनेच केल्याचं उघड झालं होतं. त्याच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांचे पथक रवाना झाले होते. शेवटी मुंबईत त्याला अटक करण्यात आली.

रोहित रिक्षा चालवण्याचं काम करत होता. पण एका बारगर्लच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्यावर होणाऱ्या खर्चासाठी घरफोडी करायला सुरुवात केली. २०१७ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी त्यानं पहिल्यांदा घर फोडलं. त्यानंतर तो फिरायला गेल्यानंतर पुणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ फेब्रुवारीला त्याने दिवसभर रिक्षाने फेरफटका मारला. यावेळी रेकी करत कोणती घरे फोडायची हे ठरवलं. कमी वर्दळीचा परिसर, सुरक्षा रक्षक नसलेली अपार्टमेंट हेरली आणि काही वेळातच त्याने ३ घरे फोडली. गुन्हा केल्यानंतर त्यानं थेट मुंबई गाठली.

डान्सबार
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...