75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime

 

Crime News : राज्यात सातत्याने धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुठे खून, कुठे दरोडा तर कुठे अपघात. आता ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री लॉजवर मुक्कामी थांबलेल्या इसमाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नेमकी काय घटना?

समोर आलेल्या माहितीनुसार, अऱविंद सुखाई चौरसिया आणि संजोग सुरेश तेंगोटे हे दोघे मित्र शिर्डीला जाणार होते. ठाणे रेल्वेस्थानकातून त्यांची ट्रेनची वेळ चुकल्याने गाडी निघून गेली. परिणामी त्या दोघांना ठाण्यातच मुक्कामी थांबावं लागलं. हे दोघे ठाण्यातील एका लॉजवर मुक्कामी थांबले. दोघांनी दोन वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या. रात्री दारू प्यायल्यानंतर दोघे स्वतंत्र रूममध्ये झोपी गेले.

परंतु, सकाळी धक्कादायक घटना घडली. संजोग तेंगोटे याने सकाळी आपल्या मित्राला सकाळी 7 वाजताच्या सुमारास फोन केला. मात्र त्याचा कोणताही रिप्लाय आला नाही. यामुळे घाबरलेल्या संजोगने लॉजवरील कर्मचाऱ्यांना घटनेची कल्पना दिली असता, कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिथापीने दरवाजा उघडला. समोरचं दृश्य अत्यंत भयावह होतं. कारण 35 वर्षीय अरविंद चौरसिया बेशुद्ध अवस्थेत पडला होता. कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

कोपरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू:

या प्रकरणात पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पोलीसांनी या प्रकरणी मित्राचा जबाब नोंदवल्याची माहिती समोर येत आहे.आता नेमका हा काय प्रकार ते तपासानंतर समजेल. परंतु, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. ही  निश्चितच चिंतेची बाब आहे.

 

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...