राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
तर, काही ठिकाणी उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गुरुवारी जळगाव येथे सर्वाधिक 45.3°C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर, सातारा इथे 22.5°C हे सर्वात कमी किमान तापमान होतं.
आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर सुरू होती चर्चा; मारहाणीत तरुणाचा मृत्यू..
आज सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर, पुण्याच्या काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
मुंबईत 24 मे रोजी 34 कमाल तर 27 अंश किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार, 25 मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते.
Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातात आरोपीच्या आजोबांचा मोठा खुलासा..