75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Pune Porsche

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीच्या आजोबात एस.के अग्रवाल यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे.

Pune Porsche Accident : पुणे पोर्शे अपघात(Pune Porsche Accident) आणि खून प्रकरणात बाल मंडळाने बुधवारी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवले आहे. आरोपी हा एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून त्याने 18 मे रोजी रात्री दारूच्या नशेत दुचाकीला त्याच्या पोर्श कारने धडक दिली. या अपघातात एक आयटी इंजिनियर मुलगा आणि बाईक चालवणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपीला बाल न्याय मंडळाने काही अटींसह 15 तासांच्या आत सोडले होते. या प्रकरणानंतर सगळीकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. परिणामी पुणे पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अल्पवयीन मुलाच्या आजोबाला आज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

आम्हाला पश्चाताप होतोय : आरोपीचे आजोबा
पोर्शे कार अपघातानंतर(Pune Porsche Accident) राजकीय वातावरणही तापलं आहे. गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांची धरपकड सुरू केली आहे. आज वाहन चालकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. मात्र, माध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्याने उत्तर दिलं नाही. तर आजोबा एस.के अग्रवाल यांनी मात्र यावर खुलासा केला आहे. जे घडलं त्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतोय. नातू अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा असा दावा आजोबांनी केला आहे.

अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी
दरम्यान पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारू पिऊन गाडी चालवत दोघांचे बळी घेणाऱ्या आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. या आरोपीला पुढचे 14 दिवस बालसुधार गृहात ठेवण्यात येणार आहे. आरोपीचं वय 17 वर्ष 8 महिने असल्यानं त्याला सज्ञान गृहित धरून खटला चालवावा अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. याआधी अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं, पण आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला काही तासांमध्येच जामीन मिळाला, यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Pune Porsche
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...