75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

viral video

Bride Groom Viral Video : लग्नमंडपात नवरदेव आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नव्या जोडप्याच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Bride Groom Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसराईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, कधी थीममुळे तर कधी इतर काही कारणांमुळे हे व्हिडीओ चर्चेत येतात. कधी-कधी वऱ्हाड्यांचा डान्स तर कधी त्यांची भांडण यांचे व्हिडीओही जोरदार शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. तुम्ही याआधी अनेकदा लग्नाच्या वरातील वऱ्हाडी मंडळींना भांडताना पाहिलं असेल, पण या व्हिडीओमध्ये चक्क नवरा आणि नवरी भांडताना दिसत आहे. 

लग्नमंडपातच वधू-वरामध्ये जोरदार राडा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. साताजन्माच्या गाठी बांधायला निघालेल्या या जोडप्यामध्ये अगदी तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पडेल की, नक्की काय चाललंय? व्हिडीओमधील नवरा-बायकोचं दोघांचं भांडण सुद्धा साधं-सुधं नाही. नवरदेव आणि नवरी एकमेकांना बुक्क्यांनी आणि चपलांनी मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अनिता सुरेश शर्मा नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या लग्नाच्या व्हिडीओमध्ये, एक जोडपं लग्नमंडपात स्टेजवर उभं असल्याचं दिसत आहे. जयमालाच्या स्टेजवर एकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर, वधू आणि वर एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. यावेळी आजूबाजूला उपस्थित लोक या दोघांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यावेळी जिद्दीला पेटलेला नवरदेव पायातील मोजडी हातात घेऊन त्याने नवरीला मारताना दिसत आहे. तर, याविरोधात वधूही जोरदार प्रत्युत्तर देत नवरदेवावर मुक्क्यांचा भडीमार करताना दिसत आहे. 

लग्न मंडपातच नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण सुरु झाले, जे अगदी हाणामारीपर्यंत पोहोचलं. मंडपात उपस्थित मंडळीकडून दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण कुणी ऐकण्यास तयार नव्हतं. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अथक परिश्रमाने मध्यस्थी करून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, दोघांचे  36 पैकी 36 गुण जुळले आहेत.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...