75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : पेणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे, या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Crime News : पेणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तरुणाच्या पोटात चाकूनं वार करण्यात आले आहेत. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओमकार म्हात्रे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर कल्पेश बोरकर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पेणमधील तरुण ओमकार म्हात्रे याने गाडीवरून पडून जखमी झालेल्या पत्रकाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याच रागातून आरोपी कल्पेश बोरकर याने ओमकार म्हात्रे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या पोटात चाकूनं वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ओमकारच्या डोक्यात दगड देखील घातला. या घटनेत ओमकार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

दरम्यान या प्रकरणात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पेण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपीचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, या हल्ल्यामागे आणखी दुसरं काही कारण आहे का? याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...