कार सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह सापडला होता. तर आता आठवड्याभराने अमीऱ खानजादा याचा मृतदेह सापडलाय.
नवी मुंबईत गेल्या आठवड्यात एक कार बेवारस अवस्थेत आढळून आली होती. या कारवर गोळीबार झाला होता. त्यावर रक्ताचे डाग होते. पण गाडी ज्यांच्या मालकीची होती ते दोघेही कारमध्ये नव्हते. आता दोघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले आहेत. कार सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह सापडला होता. तर आता आठवड्याभराने अमीऱ खानजादा याचा मृतदेह सापडलाय.
इस्टेट एजंट असलेल्या दोघांचेही मृतदेह हाती लागले असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलीय. सुमित जैनचा मृतदेह सापडल्यानंतर संशयाची सुई अमीर खानजादा याच्यावर होती. जैन याला पोलीस सुरक्षा हवी होती त्यांनीच सुपारी दिलेली. अंगावर वार झाल्याने BP हाय होऊन मृत्यू झाला. पण मंगळवारी रात्री अमीर खानजादा याचाही मृतदेह कर्नाळा अभयारण्यात सापडलाय. अमीर खानजादा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा रायगडचा पदाधिकारी आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नक्की त्यांनी त्यांना का मारले? कोणते कारण होते? याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं होतं
नेरुळवरून मिटींगसाठी दोघेही निघाले होते. पण सकाळपर्यंत ते घरी पोहोचले नव्हते. मोबाईल बंद असल्यानं जीपीएसच्या आधारे त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुरुवारी २२ ऑगस्टला त्यांची कार पाली फाटा एक्झिटवर आढळून आली. कारवर मागून गोळीबार झाला होता. तसंच रक्ताचे डागही आढळले होते. पण दोघेही गाडीत नव्हते. बुधवारी रात्री साडेदहा वाजता ते मिटिंगसाठी निघाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीही ते घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी त्यांना फोन केले. मोबाईल बंद असल्याने घरच्यांची चिंता वाढली. शेवटी दोन्ही कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अमीर खानजादा यांच्या कारला जीपीएस असल्यानं कारचा शोध घेता आला.