जळगाव येथील मुक्ताईनगर तालुक्यात ३८ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महालखेडा शिवारात ही घटना घडली असून याप्रकरणी महिलेच्या अल्पलवयीन मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महालखेडा इथं राहणारी ३८ वर्षीय महिला शेतात सकाळी काम करायला गेली होती. काम आटोपून घरी परतत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. महिला घरी न परतल्याने कुटुंबियांनी शेतात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून हत्या केल्याने महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता.
प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला गावकऱ्यांना विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते..
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत एका पुरुषाचे अनैतिक संबंध होते. त्याच मुद्द्यावरून महिलेसोबत त्याचा वाद व्हायचा. वादातूनच त्याने दगडाने ठेचून आणि शरिरावर, गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.