महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधून संतापजनक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाडे गावाकडे बहिणी निघाल्या होत्या. शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या 12 वर्षीय बहिणीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकलं.
ही घटना 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून घटनास्थळावरून 100 फूट ओढत नेलं आणि कापसाच्या शेतात फेकून दिलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर 4 पथकं करण्यात आली. चोपडा-आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यावर पोक्सो कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली आहे.
वाशिममध्येही महिलेची हत्या
दुसरीकडे वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातील 45 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. 5 आणि 6 सप्टेंबरला या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचाी तक्रार मृत महिलेच्या भावाने केली आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
आपल्या माहेरी राहणारी ही महिला दोन दिवसांपूर्वी शेतात गेली होती, मात्र ती त्या दिवशी संध्याकाळी घरी न परतल्यामुळे घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. दोन दिवसांनी महिलेचा मृतदेह गावा शेजारील जंगलातील उंच टेकडीवर आढळून आला, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.