75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मृत्यू

जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, पोहता येत नसतानाही खोल पाण्यात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोन जण पाण्यात उतरले नसल्यानं बचावले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) येथील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे या पाचही जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

त्यामुळे ते एकापाठोपाठ एक पाण्यात बुडाले. त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची आपबीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

 

मृत्यू
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...