75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Mumbai Local Mega Block

Mumbai Local Mega Block : लोकल रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. पण आता या लाइफलाइनला ब्रेक देण्यात आला आहे. लोकल रेल्वे सेवा आता तब्बल दोन दिवस ठप्प असणार आहे.

Mumbai Local Mega Block :  लोकल रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. पण आता या लाइफलाइनला ब्रेक देण्यात आला आहे. लोकल रेल्वे सेवा आता तब्बल दोन दिवस ठप्प असणार आहे. जवळपास 63 तास हा मेगाब्लॉक आहे. केवळ मुंबईच नाही तर मुंबईबाहेर जाणाऱ्या लांब पंल्ल्याच्या गाड्यांची सेवाही विस्कळीत होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 10 आणि 11ची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती रेल्वे विभागाने प्रसिद्ध केली आहे.(Mumbai Local Mega Block)

पुणे Porsche Car अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीबाबत गुन्हे शाखेचा मोठा निर्णय..

शुक्रवारी (31 मे) मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते 2 जूनच्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे 63 तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 36 तासांचा विशेष ब्लॉक परिचालीत करणार आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे 930 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.

ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
अ. ब्लॉक १ – ठाणे येथे 63 तासांचा विशेष ब्लॉक (डाऊन जलद मार्गिका)
ब्लॉक दिनांक आणि कालावधी: 30 मे (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ते 2 जून (रविवार दुपारी) 15.30 वाजेपर्यंत = 63 तास

ब्लॉक विभाग:
अप धीमी मार्गिका : कलवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
डाऊन जलद मार्गिका: ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
अप जलद मार्गिका: कलवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)

B. ब्लॉक 2 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक दिनांक: 31 मे (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ते 1 जून (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) ते 2 जून (रविवार दुपारी) 12.30 वाजेपर्यंत – 36 तास
ब्लॉकचा कालावधी:
डाऊन जलद मार्गिका : 00.30 वाजता (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते 15:30 वाजता (रविवार)
63 तास
अप धीमी मार्गिका: 00.30 तास (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते 12:30 तास (शुक्रवार )
12 तास

ब्लॉक विभाग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहीत) आणि वडाळा रोड (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (यासह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग

ब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्यांवर परिणाम

उपनगरीय सेवा रद्द:

ब्लॉक कालावधीत 930 उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:
दि.31.5.2024 (शुक्रवार) रोजी 161 सेवा रद्द केल्या जातील.
दि.04.06.2024 (शनिवार) रोजी 534 सेवा रद्द केल्या जातील.
दि.02.6.2024 (रविवार) रोजी 235 सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय सेवा रद्द:
ब्लॉक कालावधीत 444 उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:

दि.31.5.2024 (शुक्रवार) रोजी 7 सेवा रद्द केल्या जातील.
दि.01.3.2024 (शनिवार) रोजी 306 सेवा रद्द केल्या जातील
दि.02.6.2024 (रविवार) रोजी 131 सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय सेवा रद्द:
ब्लॉक कालावधीत 446 उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे कमी होतील:
दि. 01.6.2024 (शनिवार) रोजी 307 सेवा रद्द केल्या जातील.
दि.02.6.2024 (रविवार) रोजी 139 सेवा रद्द केल्या जातील.

मध्य रेल्वेने सर्व आस्थापनांना विनंती केली आहे की या दिवशी प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर कोणत्याही संभाव्य मार्गाने काम करण्याची संधी द्यावी. मध्य रेल्वेने प्रवाशांना या दिवसांत प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा असे आवाहन केले आहे.

Manoj Jarange Patil : फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर…

Mumbai Local Mega Block
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...