Manoj Jarange Patil : मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) हे एका फसवणुकीच्या प्रकरणात पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत.
Manoj Jarange Patil : मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. न्यायालयाने त्यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर हजर झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं. मात्र त्या नाटकाचे पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, नंतर शेतातील भयानक दृश्य पाहून कुटुंबीय हादरले..
मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, न्यायालयासमोर सर्व समान आहेत, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी कोर्टात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे उचित होणार नसल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं. मात्र त्या नाटकाचे पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला आहे. या प्रकरणात त्यांना आता पुन्हा एकदा न्यायालयानं वॉरटं बजावलं आहे.