75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचे नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. अयोध्येत राम मंदीर झाले, बाळासाहेब असते तर भरभरुन कौतुक केलं असतं, पण त्यांनी आनंदही व्यक्त केला नाही हे दुर्देवी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नकली शिवसेनाची उपमा योग्य आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ‘‘विकास दशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर्य आहे, याउलट त्यांनी 50 कोटी रुपये बँक खात्यातून काढून घेतले कारण त्यांना आता आचार विचार उरलेला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हनुमान चालिसा म्हटल्याने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना या निवडणुकीत रामभक्त आणि हनुमानभक्त जागा दाखवतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

ऐन निवडणुकीत जळगावचा प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर; चौकशीत सापडलं 9 किलो सोनं

ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहेत. पुढे 25 ते 50 वर्षाचा विचार करणारा व्हिजनरी लीडर श्रीकांत शिंदे आहे. मुंब्र्यातील मुस्लिम समाज विकासाचे समर्थन करत आहे. मोठ्या खासगी हॉस्पिटलला लाजवेल असे महापालिकेचे हॉस्पिटल तेही कॅशलेस सुविधा असणारे हे एकमेव आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन्स केली. अनेकांचे गळ्याचे पट्टे गेले काहीजण पळायला लागले. अहकांरी लोकांनी आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान केले. बाळासाहेबांच्या विचारांवर 2019 ला लोकांच्या मतांनी युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते, मात्र काँग्रेसला डोक्यावर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. आम्ही 2022 मध्ये चूक दुरुस्त केली आणि महायुतीचे सरकार स्थापन केले, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कल्याण मतदारसंघात वेगाने शहरीकरण झाले आहे. पाण्यासाठी इथ स्वतंत्र धरणाची आवश्यकता असून ते बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. जनता हेच आपले टॉनिक असून घरात बसून कामे होत नाही, अशी टीका शिंदेंनी उबाठा गटावर केली. आमचे सरकार रस्त्यावर उतरुन काम करते. ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाचे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आतापर्यंत साडेपाच कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुफान राडा; दोन गटात हाणामारी

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...