बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अपघात कक्षात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अपघात कक्षात झालेल्या या तुफान राड्यामुळे काहीकाळ कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीती वातावरण निर्माण झालं होतं. हाणामारीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यानं अखेर तेथील सुरक्षारक्षकांना सैम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.
दरम्यान याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं अंबेजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.