75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कार आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, सात प्रवासी जखमी झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कार आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, सात प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मालेगाव – चाळीसगाव मार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेत रिक्षाचा चुराडा झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावच्या दहिवळ जवळ चाळीसगाव मार्गावर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये रिक्षामधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त रिक्षा मजुरांना घेऊन घरी परतत होती, त्याचदरम्यान हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. तर अपघातानंतर कार खड्ड्यात पलटी झाली. कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

‘नकली वाघ पोकळ डरकाळ्या…’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला

 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...