75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

BoAt Security Breach : बोट कंपनीच्या 75 लाख ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची बातमी समोर येत आहे.

boAt Users Personal Information Leak : एअरफोन आणि स्मार्ट वॉच बनवणारी आघाडीची गॅजेट कंपनी बोट (BoAt) कंपनीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बोट कंपनीच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. हॅकर्सने बोट कंपनीच्या युजर्सचा पर्सनल डेटा चोरी (Data Leak) करत लीक केला आहे. बोट कंपनीच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक (Dark Web Data Leak) झाल्याचं निदर्शनास आलं आहे. बोटच्या ग्राहकांसाठी (BoAt Users) ही धोक्याची घंटा आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती आहे. रिपोर्टनुसार, सुमारे 7.5 मिलियन म्हणजे सुमारे 75 लाख ग्राहकांचा डेटा लीक (BoAt Users Data Leak) झाल्याचं बोललं जात आहे.

बोट कंपनीचा डेटा लीक (BoAt Data Leak) झाल्याने लाखो भारतीय ग्राहकांची (Indian Consumers) वैयक्तिक माहिती (Personal Information Laek) सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Crime) हाती लागू शकतो. फोर्ब्स इंडियाने (Forbes India) दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल 2024 रोजी बोट कंपनीच्या लाखो युजर्सचा वैयक्तिक डेटा (Personal Data Leak) डार्क वेबवर (Dark Web) आढळला आहे. लीक झालेला डेटा अतिशय संवेदनशील आहे, कारण यामध्ये ग्राहकांची (BoAt Users) वैयक्तिक माहिती (PII) आहे. 

75 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक

बोट कंपनीच्या 75 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा डार्क वेबवर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये संवेदनशील, वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. डार्क वेबवर 75 लाख ग्राहकांचा डेटा सापडला आहे. PII म्हणजे या डेटामध्ये ग्राहकाचं नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल आयडी, ग्राहक आयडी आणि इतर अनेक माहिती समाविष्ट असते.

बोट कंपनीच्या (Boat Company) 75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. याशिवाय शॉपी फाय (ShopifyGuy) नावाच्या हॅकरने या डोटा लीकची जबाबदारी स्वीकारली असून चोरीचा डेटा डार्क वेबवर अपलोड केला आहे. सध्या, या डेटा लीकबाबत (Data Leak) बोट कंपनीकडून (boAt) कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. 

डार्क वेबवर (Dark Web) युजर्सचा (Users) डेटा लीक (Data Leak) होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, फेसबुक (मेटा), मायक्रोसॉफ्ट आणि अगदी गुगलच्या लाखो वापरकर्त्यांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...