75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

 आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यातील वाहनाला नागपूरजवळ भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकांचा प्रचारासाठी जात असताना आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यात वाहनाला मोठा अपघात झाला. नागपूरपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात ही घटना घडली. यामध्ये जयस्वाल यांच्या P.A. समवेत त्यांच्या ताफ्यातील दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार आशिष जयस्वाल यांच्या भरधाव गाडीचा व समोरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात झालेल्या अपघातात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळ दुपारी आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारला अपघात झाला. कन्हान -केरडी रोडवर अनियंत्रित होऊन दोन वाहने समोरासमोर ऐकमेकांना धडकली. या अपघातात दोनजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये एका महिला व पुरुष वकिलाचा समावेश आहे. तर आमदार आशिष जयस्वाल यांचे पीएही या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा आमदार आशिष जयस्वाल स्वतः कारमधून प्रवास करत नव्हते हे सुदैवाने म्हणावे लागेल. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...