बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गाडी अडवून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ते बीडवरून म्हाळस जवळा या गावाकडे निघाले असताना वाटेतच त्यांची गाडी अडवत सात ते आठ जणांनी त्यांना जबर मारहाण केली. या घटनेत खांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे बीडचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. बीडवरून म्हाळस जवळा या गावाकडे जात असताना त्यांची गाडी आडवत सात ते आठ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत ज्ञानेश्वर खांडे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे. ते दोघेही या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.