75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Shocking video: सासू-सूनेचं भांडण हे काय नवीन नाही. पण, सुनेकडून वृद्ध सासूला अशा प्रकारे मारहाण करतानाचा हा धक्कादायक व्हिडीओ संतापजनक आहे.

Woman Beats Mother-in-Law video : प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच. काही प्रेमाचे असतात; तर काही भांडणाचे. सासू-सूनेचं भांडण हे काय नवीन नाही. पण, सुनेकडून वृद्ध सासूला अशा प्रकारे मारहाण करतानाचा हा धक्कादायक व्हिडीओ संतापजनक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामध्ये एका घरात एक महिला आपल्या वृद्ध आजे सासूला मारहाण करताना दिसत आहे.

भोपाळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेला तिचा नातू आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली. वृद्ध महिलेला तिने बनवलेले जेवण आवडत नसल्याने आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पुरुष आणि एक स्त्री एका वृद्ध महिलेवर निर्दयीपणे मारहाण करत आहेत. हात पकडून गळा दाबत आहे तर व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या पुरुषानं वृद्ध महिलेला पकडून ठेवलं आहे. बेडवर बसलेली दुसरी एक महिला वृध्द महिलेला काठीने बेदम मारहाण करते. हा व्हिडिओ त्यांच्या शेजाऱ्यांनी रेकॉर्ड केला होता.

दीपक सेन आणि त्यांची पत्नी पूजा सेन असे आरोपींचे नाव आहे. दीपक सेन भोपाळच्या बरखेडी भागात सलून चालवतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जोडप्याने भोपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि अटक केली.घरगुती वादातून भांडण होणं ही सामान्य बाब आहे; पण अशा प्रकारे मारहाण करणे हे आक्षेपार्ह आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोपाळ पोलिसांनी याची दखल घेतली आहे. शहर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओला उत्तर देत या प्रकरणी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले आहे. @RaizadaYVS नावाच्या एक्स अकाऊंटवर हा भयानक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २ मिनिट २० सेकंदांचा असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोकांनी अशा लोकांवर संताप व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/RaizadaYVS/status/1773058618679550178

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...