75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव आणि औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. आता त्याच धर्तीवर अलिबागचं देखील नामकरण होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अलिबागच्या नामकरणासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीलं आहे. ‘मायनाक नगरी’ असं अलिबागचं नामकरण करण्यात यावं अशी मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

नेमकं काय आहे विधानसभा अध्यक्षाचं पत्र?

‘परकीय आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यात सागरी किल्ले आणि मराठा आरमाराने महत्त्वाची भूमिका बजावली. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे “मायनाक नगरी” असे नामकरण करण्यात यावे आणि मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे,’ अशा आशयाचे एक पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

Shocking video : क्रूरतेचा कळस ! वृद्ध सासूला जनावरासारखं मारलं; त्याने तोंड दाबलं अन् बायकोनं…संतापजनक Video व्हायरल

दरम्यान यापू्र्वी देखील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ऐतिहासिक शहरांचं नामकरण करण्यात आलं आहे. उस्मानाबाद शहराचं धाराशिव तर औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्या या पत्रानंतर अलिबागचं देखील नामकरण होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...