मांजर चावल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू हि वैद्यकीय क्षेत्राला हादरून सोडणारी घटना आहे. मांजर चावल्यानंतर हायपर टेंशनने देखील मुलाच्या मृत्यूची शक्यता नाकारत येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेबद्दल बालरोग तज्ज्ञांचे काय मत आहे?
नागपूरात मांजर चावल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू हि वैद्यकीय क्षेत्राला हादरून सोडणारी घटना आहे. ही दुर्मिळ घटना असून श्रेयांशु पेंदाम या मुलाच्या मृत्यूचे प्रत्यक्ष कारण शोधले जात आहे. व्हिसेरा रिपोर्टमधून त्या बालकाचे मृत्यूचे नेमके कारण कळेल. पण मांजर चावल्यानंतर हायपर टेंशनने देखील मुलाच्या मृत्यूची शक्यता नाकारत येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात बालरोग तज्ज्ञ डॉ गिरीश चरडे यांनी काय म्हटंलय जाणून घ्या..
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका 11 वर्षीय बालकाला माजरीने चावा घेतल्यानंतर काही तासात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. श्रेयांशु क्रिष्णा पेंदाम असे या बालकाचे नाव असून शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तो काही मित्रांसोबत खेळत होता. त्यानंतर तो घरात आला. खेळत असताना मांजराने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्याच्या पायाचा चावा घेतला असे त्याने आईला सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या. त्याचे आईवडील त्याला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
श्रेयांशुचा मृतदेह तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. याबाबत हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नव्हते.मांजर चावल्याने इतक्या कमी वेळात मृत्यू होणे ही दुर्मिळ घटना आणि अतिशय दुःखद आहे. नेमका मृत्यू कशामुळे हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे बालरोग तज्ञ डॉ गिरीश चरडे यांनी सांगितले.
या घटनेबाबत डॉ. प्रवीण पाडवे म्हणतात की, मांजराने चावा घेतल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू ही दुर्मिळ घटना आहे. मांजराने चावा घेतल्याननंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. या जनावरांने केलेल्या हल्ल्याने तो घाबरल्याने त्याला काही वेळात उलट्या सुरु झाल्या त्यानंतर ओकारी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा. आणखी कोणता विषारी सापाचा दंश केला असू शकतो का? किंवा पायाला जखमा किरकोळ असल्या तरी इतर ठिकाणी इजा झाल्याने मृत्यू होऊ शकतो.