Weather update : महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे, मात्र त्यातच हवामान विभागाकडून आता पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Weather update : देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे, दिल्लीमध्ये तापमानानं उच्चांक गाठला आहे. दिल्लीचं तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंडमध्ये उष्णतेची लाट आहे.
मात्र आता लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवसांत हवामान विभागाकडून (imd) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Weather update)
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.दुसरीकडे राज्यात जरी काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असला तरी देखील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची(Weather update) शक्यता आहे.
नुसता पाऊसच पडणार नसून वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका राहण्याची शक्यता आहे.
ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, ब्रह्मपुरी येथे 46 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे.
मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तास आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.