Vasai News : वसई पश्चिमेच्या रानगाव मर्सेस येथे एका रीसॉर्टवर पिकनिकासाठी गेलेल्या एका ग्रुपसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Vasai News : वसई पश्चिमेच्या रानगाव मर्सेस येथे सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे.
भांडुपच्या गणेश नगर येथून 14 महिला आणि 4 लहान मुलांचा ग्रुप आज वसईच्या मर्सेस राणगाव येथील एच.डी. रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आला होता.
सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना एक चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. समीक्षा दिनेश जाधव (वय 7) असे स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आज दुपारी 1 ते 1:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
एच. डी. रिसॉर्टमध्ये कोणताही स्वीमर गार्ड तेथे उपस्थित नसल्यामुळे मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. वसई पोलिसांनी फक्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, रिसॉर्ट मालकावर गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
jitendra awhad : जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल..
वसई विरार नालासोपारा परिसरातील समुद्रा किनाऱ्यावर असे अनेक अनधिकृत रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये अशा घटना घडल्या आहे.
अनधिकृत रिसॉर्टबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील पोलीस, महापालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्यावर का कारवाई करत नाही? रिसॉर्ट मालकांच्या अर्थपूर्ण व्यवहारात मूग गिळून गप्प बसले आहेत का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, नंतर शेतातील भयानक दृश्य पाहून कुटुंबीय हादरले..