Pune News : पुण्यातील पिंपरी शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली
Pune News : गेल्या काही दिवसांत पुण्यात गुन्ह्याच्या अशा काही घटना घडल्या की शहर ढवळून निघालं आहे. यामध्ये पोर्शे कार अपघात असो की पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावणं. या घटना घडल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. या सर्व घटना कमी होत्या की काय म्हणून आता थेट पोलीस ठाण्याच्या जवळच गुन्हा घडला आहे.
पिंपरी शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. सांगवी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर 30 वर्षीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरलं आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दीपक कदम (वय 30) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.