75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात पराभवाचा मोठा धक्का बसला. भाजपला महाराष्ट्रातून फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली.

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात पराभवाचा मोठा धक्का बसला. भाजपला महाराष्ट्रातून फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मोकळं करा, असं फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे.

फडणवीसांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्यावर सुषमा अंधारेंनी टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपमध्ये फक्त मोहित कंबोज आणि केशव उपाध्ये सोडून फडणवीसांच्या मागे कुणीही उभं राहिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसंच त्यांनी भाजपवर टोला लगावताना वाल्या कोळ्याची गोष्टीचाही दाखला दिला.

पंकजा मुंडे यांचे आक्षेपार्ह स्टेटस, अहमदनगरधील ‘या’ गावात तणाव, पोलीस ठाण्यात मोठा जमाव

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

वाल्या कोळ्याने म्हणे अनेकांना लुटलं..दरोडे टाकले..
काही जिवानिशी गेले.. काही अपंग जायबंदी झाले.
एकदा वाल्या कोळी ज्या रस्त्यात थांबला होता त्या रस्त्या वर एक ऋषीमुनी आले. ऋषीमुनीला मारण्यासाठी वाल्या कोळ्यांनी जेव्हा शस्त्र उगारले तेव्हा त्या ऋषीमुनी ने त्याला विचारले , हे सगळं पाप कुणासाठी करत आहेस ?
वाल्याने उत्तर दिलं, माझ्या कुटुंबासाठी आई-वडील बायको मुलाबाळांसाठी..!

” अरे पण तू ज्यांच्यासाठी हे सगळं करत आहेस. उद्या जर काही अडचणीचा काळ आला. तु हे जे पाप करत आहेस त्या पापाचे भागीदार होण्याची जर कधी वेळ आली तर ते तुझ्या पापाचे भागीदार होतील का ?
वाल्या कोळी या प्रश्नावर आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटला. पण तरीही त्याने रेटून म्हटले होय अशी काही वेळ आली तर मी ज्यांच्यासाठी या चोऱ्यामार्या करत आहे ते माझ्या पापाचे भागीदार व्हायला तयार होतील.

ऋषी शांतपणे वाल्याला म्हणाले तुला खात्री वाटते का ?

वाल्या कोळी ठामपणे हो म्हणाला.

यावर ऋषीमुनी ने पुन्हा बोलले म्हणाले मी या ठिकाणी असाच थांबतो तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या आप्तस्वकीयांना विचारून ये . काय ते तुझ्या पापा मध्ये सहभागी व्हायला तयार आहेत का?

Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप..

वाल्या कोळ्याच्या प्रश्नावर काय उत्तर मिळाले हे जाणकारांना माहित आहे.

पण हि कथा आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे ,
काल देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या भाजपाचा पराभव स्वीकारण्याचा मानभावीपणा दाखवत राजीनाम्याची भाषा करून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र देवेंद्रजी या सगळ्या प्रकरणात एकटे पडले.

लाभार्थ्यांच्या यादीतला एकटा मोहित कंबोज आणि संपूर्ण पक्षाकडूनकडून उपेक्षित राहिलेले केशव उपाध्ये वगळता
देवेंद्रजींच्या जीवावर ज्यांनी चिक्कार लाभाची पदे आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा केली. काहींनी मुंबईत 15- 15 ,
20-20 कोटीचे डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केले. त्यातला एकही त्यांच्या समर्थनार्थ कालपासून बोलताना दिसत नाही.
जाणकारांनी काय अचूक लिहून ठेवलंय ,
कठीण समय येता कोण कामास येतो?

 

Devendra Fadnavis
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...