75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

पंकजा मुंडे

महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेला काही भागात जातीय समीकरणे दिसली. बीडमध्येदेखील अशीच गणिते होती असे म्हटले जाते. दरम्यान आता निवडणूक झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याक्रुिद्ध आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता.

तालुक्यातील असंख्य मुंडे समर्थकांनी पोलिस स्टेशनला सुमारे दोन तास गर्दी करीत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिस स्टेशनला एका माजी लोकप्रतिनिधीलाही संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागून त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. याबाबतची माहिती कळतात पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनीही भेट देत माहिती घेतली.

संतप्त जमावाला समजूत काढत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिल्यानंतर पोलीस स्टेशन मधून जमाव पांगला. पोलिसांच्या तत्परतेने शहरासह तालुक्यात मोठा जातीय तणाव टळला आहे.

काही कार्यकर्ते शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जातीवाद पसरून तणाव निर्माण झाला होता. त्याचे लोण पाथर्डी तालुक्यात पसरू नये, याची खबरदारी घेत संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीयनि घेतली.

पंकजा मुंडे
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...