75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Weather

Weather Updates : महाराष्ट्रातील जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत होती, तो मान्सून कोकण किनारपट्टीवर पोहोचला आहे. यानंतर आता हवामान खात्याने पुढच्या तीन ते चार तासांसाठी इशारा दिला आहे.

Weather Updates : तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ भागात सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दक्षिण-पश्चिम मान्सून 6 जून म्हणजेच आज महाराष्ट्रात पोहोचल्याचं सांगितलं.

मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढचे तीन ते चार तास धोक्याचे असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे.

पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, नांदेड आणि मुंबईच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या भागात वारे 30-40 किमी प्रतीतासाने वाहतील, असं आयएमडीने सांगितलं आहे.

पुढच्या तीन ते चार तासांमध्ये या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि नंतर बंगालच्या खाडीमार्गे इस्लामपूरपर्यंत आला आहे. मान्सून 7-8 जूनपर्यंत मुंबईत प्रवेश करेल आणि 10 जूनपर्यंत राज्यभरात पसरेल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता. कोकण, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही तापमान 40 ते 45 डिग्रीपर्यंत होतं. तसंच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये बुधवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. यानंतर आजही कोकणात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

Weather
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...