75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं होतं. पण या चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय पक्षाने लढवलेल्या सर्व 10 जागांवर मोठा फटका बसला. येथे अपक्ष उमेदवारांनी मोठी मतं घेतली.

Sharad Pawar : तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन चिन्हाच्या साधर्म्यावरुन शरद पवार गटाला फटका बसल्याचं बोललं जातंय. दिग्गज पक्ष फोडून सोबत पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हही घेवून गेले. मात्र तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेटही महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 80 चा राहिला. घड्याळ चिन्ह अजितदादांनी मिळवल्यानंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. मात्र शरद पवारांच्या १० पैकी तब्बल ९ उमेदवारांविरोधात फक्त ”तुतारी” या चिन्हासह अपक्ष उभे राहिले. आरोपांनुसार यामुळे मतदार संभ्रमित झाले. अनेक जागांवरचं लीड कमी झालं आणि याच संभ्रमामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदेंना पराभूतही व्हावं लागलं.

बाबू भगरे नाशिकच्या गंगावाडीमध्ये राहतात. मासेमारी त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी दिंडोरी लोकसभेत अपक्ष म्हणून राज्यात सर्वाधिक मतं मिळवली आहेत. ईव्हीएमवरच्या रचनेनुसार दिंडोरी लोकसभेत क्रमांक १ चे उमेदवार होते शरद पवार गटाचे भास्कर भगरे, चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. क्रमांक दोनच्या उमेदवार होत्या भाजपच्या भारती पवार – चिन्ह कमळ, क्रमांक तीनचे उमेदवार होते बाबू भगरे – चिन्ह होतं तुतारी.

शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजय झाला. मात्र बाबू भगरेंना सुद्धा 1 लाख 3 हजार 632 मतं मिळाली. आश्चर्य म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे पेशानं शिक्षक असल्यानं त्यांची ओळख भास्कर भगरे गुरुजी किंवा सर म्हणून आहे. मात्र ईव्हीएम मशीनवर अपक्ष बाबू भगरेंच्या नावापुढे सर असा उल्लेख होता. वास्तविक बाबू भगरे हे प्रत्यक्षात तिसरी इयत्ता शिकलेले आहेत. यावर भास्कर भगरेंनी आक्षेपही घेतला मात्र आपल्याला लोक सर नावानं बोलवत असल्याचा दावा बाबू भगरेंचा आहे.

दुसरीकडे निकालानंतर बाबू भगरे चमत्कारिकरित्या गायबही झाले होते. बाबू भगरेंना माध्यमांनी गाठून उलट-सुलट प्रश्नांनी हैराण करु नये म्हणून ते नॉट रिचेबल झाले का. ते स्वतः निवडणुकीत उतरले होते की त्यांना उतरवलं गेलं होतं., अशा चर्चा दिंडोरी लोकसभेत होत आहेत.

याशिवाय सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार होते शशिकांत शिंदे. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. ते 32 हजार 771 मतांनी पराभूत झाले. इथं अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं तुतारी. त्यांना 37 हजार 62 मते मिळाली.

नगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंकेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस ते 28 हजार 929 मतांनी जिकंले. इथं गोरक्ष आळेकर अपक्ष लढले, चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 24 हजार 625 इतकी.

भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. 66 हजार 121 मतांनी ते विजयी झाले. इथं अपक्ष कांचन वखारे लढल्या., चिन्ह होतं तुतारी….मतं घेतली 24 हजार 625.

रावेर लोकसभेत श्रीराम पाटील उमेदवार होते., चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. ते २ लाख 72 हजारांनी पराभूत झाले इथं अपक्ष होते एकनाथ साळुंखे. चिन्ह तुतारी. मतं घेतली 43 हजार 982.

माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते उभे होते., चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस…1 लाख 20 हजारानं ते जिंकले त्यांच्याविरोधात अपक्ष रामचंद्र घुटुकडे उभे राहिले., चिन्ह होतं तुतारी….मतं घेतली 58 हजार 421

बीडमध्ये उमेदवार होते बजरंग सोनवणे. चिन्हं होतं तुतारी वाजवणारा माणूस. सोनवणे साडे 6 हजारांच्या फरकानं जिंकले. इथं अशोक थोरात नावाचे अपक्ष उमेदवार तुतारी चिन्हावर लढले. मतदान घेतलं तब्बल 54 हजार 850.

मविआ कार्यकर्त्यांच्या आरोपांनुसार तर बीडमधल्या काही मुस्लिम वस्तीत बजरंग सोनवणेंचे पोस्टर अपक्ष उमेदवाराचं तुतारी चिन्ह छापून वाटले गेले. त्यामुळेही अनेक मतांचा तोटा झाल्याचा दावा केला जातोय. या फेसबूक पोस्टनुसार बजरंग सोनवणेंचा फोटो असून त्यांच्या पुढे अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांच्या तुतारीचं चिन्ह आहे.

बीड लोकसभेतल्या ईव्हीएमच्या रचनेनुसार पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंडे होत्या., चिन्ह कमळ. दुसऱ्या क्रमांकावर बजरंग सोनवणे. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. तिसऱ्या स्थानी सिद्धार्थ टाकणकर.चिन्ह हत्ती आणि चौथ्या स्थानी होते अशोक थोरात – चिन्ह तुतारी

Sharad Pawar
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...