ऐन लोकसभा निवडणुकीत शिर्डी येथे गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डीतील खाजगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिची समोर आली आहे. यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
आईने ओलांडली क्रूरतेची सीमा; पोटच्या 6 वर्षीय मुलाचं शिर केलं धडावेगळं..
साईबाबांची शिर्डी आज गोळीबाराच्या घटनेने हादरून गेली. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून आज मंदिराजवळ असलेल्या खाजगी पार्कींगमध्ये दोन गटात वाद झाला. यातून बंदूकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने कुणालाही ह्या गोळ्या लागल्या नाही. मात्र, जवळ असलेल्या एका हॉटेलच्या रूमची काच फुटून गोळी आरपार गेली. यानंतर आरोपी पसार झाले आहेत.
भरदिवसा ही घटना घडल्याने शिर्डीत दहशतीचे वातावरण असून साईभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार झाला तिथे व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ही घटना घडल्याने या घटनेला राजकीय किनार तर नाही ना? याचाही पोलीस तपास करत आहे.
बोगस डॉक्टरांचा बोगस दवाखाना.. कसलीच डीग्री नसताना करायचा अवैध गर्भपात