75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

आई आपल्या मुलांसाठी अगदी काहीही करायला तयार असते. आईसारखं निस्वार्थी प्रेम जगात कोणीच करू शकत नाही, असं म्हणतात. आपल्या लेकराला संकटातून बाहेर काढण्यासाठी ती अगदी स्वतःचा जीवही द्यायला तयार असते. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. आई-वडिलांनीच आपल्या मुलांची हत्या केल्याच्या घटनाही समोर येतात. अशीच एक घटना सोलापूरच्या माढा येथूनही समोर आली आहे.

यात एका महिलेनं आपल्या मुलाची हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. माढा तालुक्यातील कव्हे इथे एका आईनेच आपल्या मुलाचा जीव घेतला. महिलेनं 26 फेब्रुवारी 2024 आपल्या 6 वर्षीय चिमुकल्याचा खून केला. यानंतर तिने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपलं माहेरकडील प्रेमप्रकरण सासू, सासऱ्यांना कळेल की काय? या भीतीने तिने हे कृत्य केलं.

बोगस डॉक्टरांचा बोगस दवाखाना.. कसलीच डीग्री नसताना करायचा अवैध गर्भपात

या घटनेत महिलेनं आधी तिच्या मुलाला विचारलं, टीव्ही पाहतो काय? यानंतर तिने 6 वर्षीय प्रणवचा गळा आवळला. प्रणवचा खरंच मृत्यू झालाय का, हे पाहण्यासाठी तिने त्याला हलवून पाहिलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर यानंतर तिने जे केलं, ते आणखीच भयानक होतं. आपण आत्महत्या केल्यावर मुलगा मेला नाही तर? असा विचार तिच्या डोक्यात आला. यानंतर तिने कुऱ्हाडीने मुलाचं शिर तोडून धडावेगळं केलं.

मुलाला मारल्यानंतर महिलेनं स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने आधी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. यानंतर तिने तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कौशल्या गणेश चोपडे असं मुलाचा जीव घेणाऱ्या आईचं नाव आहे. मुलाचे आजोबा नारायण चोपडे यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती.

Holi 2024 : होळीच्या मुहूर्तावर भद्राचं सावट? शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याकडून होलिका दहनाची तिथी आणि वेळ

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...