75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यातील आणखी एका बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.

धक्कादायक बातमी समोर आली आहे. आणखी एका मोठ्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करत चक्क 9 कोटी रुपये कर्ज काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी पैकी अभिषेक जयस्वाल हे भाजपचे पदाधिकारी तसेच जिल्हा बँकेचे संचालक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणानं गमावला जीव..

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्र सादर करत चक्क नऊ कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अभिषेक जगदीश जस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी अभिषेक जयस्वाल हे भाजपचे पदाधिकारी तसेच जिल्हा बँकेचे संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील समर्थनगर भागातील  कोट्यावधीची जमीन विकत देण्यास मूळ मालकाने नकार दिल्यानंतर अभिषेक जयस्वाल यांनी त्याच जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली आणि रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदी खत तयार करून मलकापूर अर्बन बँकेतून 9 कोटी रुपयांचं कर्ज उकळलं आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत आर्थिक गुन्हाशाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

‘आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा अन्…’, मतदानानंतर जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...