छत्रपती संभाजीगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्याजवळ अपघातामुळे जळगाव महामार्गावर वाहनांची दहा किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे.
पुलावर बांधकाम सुरु असल्याने रस्ता अरुंद आहे. त्यातच दोन ट्रकचा अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
एसटी बस, मोठे ट्रक यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून जवळपास एक तास महामार्ग ठप्प आहे.
मित्राने केसाने कापला गळा; अपहरण झालेल्या तरुणीची हत्या; आरोपींचा धक्कादायक खुलासा..
अपघातानंतर दहा किमी पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या असताना वाहतूक पोलीस मात्र दिसत नव्हते. यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केलीय.
मागील सहा वर्षापासून महामार्गाचे काम सुरू असून पुलावर एका बाजूनेच रस्ता होता. तोच रस्ता अपघातामुळे बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
‘कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही’; राष्ट्रवादी च्या आमदाराची खदखद बाहेर