Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या निकालांना 2 दिवस बाकी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड घडली आहे.खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलंय.
Chhatrapati Sambhajinagar : देशातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलनुसार एमआयएमची एकमेव जागा धोक्यात दिसत आहे. अशात लोकसभा निकालाआधीच खासदार इम्तियाज जलील यांना धक्का बसला आहे. खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलंय. लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आलं.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणते कार्य केले, सुप्रीम कोर्टात आपण कोणता निर्णय घेतला आणि काय करणार आहात? याविषयी विचारणा करण्यासाठी हे घेराव आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान यावेळी लोकविकास परिषदेच्या आंदोलकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवाय औरंगाबाद जिंदाबाद अशाही घोषणा या आंदोलकांनी दिली आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Weather Update : आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस; हवामान विभागाने दिला हायअलर्ट..
इम्तियाज जलील यांची सीट धोक्यात?
यावेळी एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) नसल्याने इम्तियाज जलील यांचे गणित काहीसे बिघडले आहे. शिवाय अकोल्यात एमआयएमचा पाठिंबा घेऊनही वंचितने संभाजीनगरात मुस्लिम उमेदवार दिला आहे. अफसर खान यांना वंचितने मैदानात उतरवले असून एमआयएमच्या मुस्लिम वोट बँकेवर परिणाम करण्याचा हा वंचितचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे ओवेसी यांनी आपल्या पदयात्रा आणि सभांमधून गेल्या निवडणुकीत मिळालेली दलित मतं आपल्याकडे कशी कायम राहतील, यासाठी प्रयत्न केला. इम्तियाज जलील यांनी शहरी व ग्रामीण भागात प्रचार करतानाच समाजातील विविध घटकांनाही साद घातली आहे. ओवेसी यांच्या पदयात्रा आणि सभेचा इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना मतांच्या रुपात किती फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.