75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात(Samruddhi Mahamarg Accident) घडला असून एकजण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Accident :  समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. रविवारी देखील आणखी एक भीषण अपघात घडला. महामार्गावर आयशर टेम्पो मागून ट्रकला धडकल्याने मोठा अपघात घडला. या भीषण अपघातात टेम्पोमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ घडली.

कसा घडला अपघात?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर शिवारातील चॅनेल नंबर 502 वर आयशर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आयशर चालकाला डुलकी लागली आणि तो थेट समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकला यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच एका स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात घडून यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा हा अपघात झाला. त्यामुळे वैजापूर परिसर अपघाताचा हब बनला की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणतात, त्यात नवल ते काय?

सहादिवसांपूर्वीच कारचा अपघात
समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याच महामार्गावरील वाशिम येथील मालेगाव तालुक्यातील रिधोरा गावाशेजारील चॅनल नंबर 239 जवळ हुंडाई क्रेटा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7 वाजता संभाजीनगरवरून अमरावतीकडे निघालेल्या हुंडाई क्रेटा कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक कार ही ट्रकच्या मागच्या बाजूने आतमध्ये घुसली. त्यामुळे कारचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक लोक जमा झाले होते. त्यांनी तातडीने जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात हलवले.

J&K Bus Attack : जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, Video…

 

Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...