75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

छ. संभाजीनगरात ‘गब्बर’ची एन्ट्री; छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक पत्र व्हायरल होत असून या पत्रानं खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं आहे. सध्या सर्वत्र या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्याकडे 100 लोकांची गॅंग आहे. भ्रष्टाचारी लोकांना सोडणार नाही असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे. ज्याने पत्र लिहिलं त्या व्यक्तीनं आपण गब्बर असल्याचा दावा या पत्रात केला आहे. रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा’ असा उल्लेख देखील या पत्रात केला आहे.

अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गॅंग तयार केली असून, लवकरच छत्रपती  संभाजीनगरमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करणार असल्याचा दावा या पत्रात त्याने केला आहे.

विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने ’ रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा’ असा उल्लेख देखील या पत्रात केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून, हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गब्बर
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...