75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Pune Porsche Accident

Pune Porsche Accident : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आता राज्यातल्या सगळ्या पब आणि बारवर आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे.

Pune Porsche Accident : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आता राज्यातल्या सगळ्या पब आणि बारवर आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर करून सगळ्या पब आणि बारवरवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचं प्रत्येक जिल्ह्याच्या एक्साईज एसपीच्या कार्यालयासोबत कनेक्शन असेल. जर ठराविक वेळापेक्षा जास्त काळ बार सुरू राहिले तर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक्साईज एसपी कार्यालय आणि पोलीस स्टेशनचा अर्लाम वाजणार आहे. हा अर्लाम वाजल्यानंतर पोलिसांना तात्काळ कारवाई करता येणार आहे.(Pune Porsche Accident )

Mumbai Local Mega Block : मुंबईच्या लाइफलाइनला ब्रेक! 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू; तब्बल 930 गाड्या रद्द…

अल्पवयीन मुलांना दारू मिळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने सगळ्या पब आणि बारमध्ये थंब सिस्टिम वापरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे.(Pune Porsche Accident )

‘सगळ्या पब आणि बारवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान वापरून सगळ्या पब आणि बारवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं कनेक्शन थेट जिल्ह्याच्या एसपी कार्यालयाशी जोडलं जाईल. जर कोणता पब किंवा बार रात्रीपर्यंत सुरू राहिला तसंच नियमाचं उल्लंघन झालं तर याचा अर्लाम एसपी, डिव्हिजनल एसपी आणि कमिश्नरच्या मोबाईलवर वाजेल आणि त्यामुळे लगेच कारवाई केली जाईल’, असं शंभुराज देसाई म्हणाले.

पुणे Porsche Car अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीबाबत गुन्हे शाखेचा मोठा निर्णय..

नियमाचं उल्लंघन झालं तर 3 वेळा नोटीस दिली जाईल, यानंतर कडक कारवाई केली जाईल. जर आमचा कुठलाही अधिकारी यामध्ये आढळला तर त्याच्यावरही ऍक्शन घेतली जाईल. अल्पवयीन मुलांपर्यंत दारू पोहोचू नये यासाठीही आम्ही प्रस्ताव आणला आहे. यामुळे सगळ्या बार आणि पबवर थंब सिस्टिम लावली जाईल, ज्यामुळे वय बघूनच आतमध्ये प्रवेश दिला जाईल, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

Pune Porsche Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...